*ओबीसी आरक्षण न दिल्यामुले महा विकास आघाडी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात भाजपा काटोल शहर व तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या रस्ता रोको आंदोलन*
काटोल-प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे
काटोल – सर्वोच्च न्यायालयने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण महाराष्ट्र्राच्या महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षम धोरणामुळे 4.3.2021 ला रद्द बदल केले यामुळे महाराष्ट्रातले 58000 ओबीसी समाजाची राजकीय व्यक्तींवर अन्याय झाला या विषयांवय आज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षा तर्फे ओबीसी समाजाचे आरक्षण पुनर्वित करण्याकरिता या महा भकास आघाडी ला जाग येण्याकरिता काटोलात भाजपा शहर व ग्रामीण यांनी बाबासाहेब आंबेडकर चौक येथे 2 ते 3 तास चक्का जाम आंदोलन केले.
या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा नागपूर ग्रामीण उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर, नागपूर जिल्हा कृषी आघाडी अध्यक्ष संदीप सरोदे, काटोल शहर अध्यक्ष जितेंद्र तुपकर, कार्याध्यक्ष विजय महाजन, काटोल तालुका अध्यक्ष योगेश चाफले, जिल्हा भाजपा मंत्री दिलीप ठाकरे, भाजपा नागपूर क्रीडा आघाडी अध्यक्ष लक्ष्मीकांत काकडे, युवा मोर्चा उपाध्यक्ष अनिकेत अंतुरकर, भाजपा महिला उपाध्यक्ष प्रतिभा गवळी, काटोल शहर महामंत्री सोपान हजारे, मनीष धवड, जिल्हा कोषाध्यक्ष युवा मोर्चा शत्रूघन राऊत, महामंत्री ग्रामविकास आघाडी प्रमोद चाफले, यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले व या वेळी विविध व्यक्त्यांचे भाषण झाले.
या वेळी जवळपास 3 तास ओबीसी समाजाच्या मागण्याकरिता चक्काजाम करण्यात आले व महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी तालुका महामंत्री प्रमोद धारपुरे, तालुका कृषी आघाडी अध्यक्ष गुणवंता खवसे, हेमंत कावडकर, प्रमोद निर्वाण, रवीजी तुपकर, पुरुषोत्तम घोडमारे, प्रफुल गजबे, महिला अध्यक्ष कल्पना नागपुरे, युवा मोर्चा अध्यक्ष अश्विन रिधोरकर,नगर परिषेदेचे उपाध्यक्ष सुभाष कोठे, नगर परिषद सभापती प्रा. देविदास कठाने, किशोर गाढवे, राजू चरडे, मनोज पेंदाम, प्रशांत श्रीपतवार, माजी नगराध्यक्ष तानाजी थोटे, माजी उपाध्यक्ष हेमराज रेवतकर, ललित कठोळे, शुभम परमाल, चैतन्य भजन, रोशन झळके, अतुल बावणे, शुभम रोकडे, प्रतीक जवंजाळ, कैलास राऊत, शुभम मानकर, उपस्थित होते.