*दोन जिल्हापरिषदे करीता 5 तर तीन पंचायत समीती करीता 14 असे एकुण 19 उम्मेदवारी अर्ज दाखल*
*जिल्हापरिषद पंचायत समीतीच्या पोट निवडणुक नामांकरणाच्या अंतीम दिवशी उसळली उम्मेदवारांची गर्दी*
मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेरः राज्यातील जिल्हापरिषद व पंचायत समीत्यांची पोट निवडनुका जाहीर झाल्याने नामांकणाच्या शेवटच्या दीवशी नागपुर जिल्हापरिषदेच्या दोन सदस्य व सावनेर पंचायत समीती सदस्यांच्या रीक्त तीन जागांकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता उम्मेदवारांची तहसील कार्यालयात एकच गर्दी उसळली.
*नामांकणाच्या शेवटल्या दिवशी काँग्रेस व भाजपाच्या उम्मेदवारांनी आपल्या वरिष्ठांना सोबत घेऊण अर्ज दाखल केले*
*नागपुर जिल्हापरिषदेचे माजी उपसभापती मनोहर कुंभारे व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सतीश लेकुरवाळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसाधारण महिला करिता राखीव केळवद जिल्हापरिषद करीता काँग्रेसचे नागपुर जिल्हापरिषदेचे माजी उपसभापती मनोहर कुंभारे यांच्या पत्नी सौ. सुमित्रा मनोहर कुंभारे,तर वाकोडी करीता जोती सिरसकार,व पंचायत समीती सदस्यांकरिता काँग्रेसच्या वतिने ममता प्रशांत केसरे वाघोडा, भावना चिखले,बडेगाव,गोविंदा बारकु ठाकरे नांदागोमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला*
*तर भाजप तर्फे जिल्हापरिषदे करिता आयुषी धपके वाकोडी,संगीता मुलमुले तर पंचायत समितीकरिता जयश्री चौधरी बडेगाव,भारती मनोज आठनकर वाघोडा व मानीक बल्की नांदागोमुख यांनी भाजपचे अधिकु्त उम्मेदवार म्हणून अर्ज दाखल केले*
*एकिकडे काँग्रेस पक्षाने आपल्या पुर्वीच्याच उम्मेदवारांवर विश्वास करत त्यांना परत संधी दिली तर भाजप व्दारे नविन उम्मेदवारांना रिंगणात उतरवीले असले तरी काँग्रेस व भाजपच्या उम्मेदवारासह केळवद जीप.2,वाकोडी जीप 3,नांदागोमुख पस.5,बडेगाव 5 तर वाघोडा पस.करीता 4 उमेदवारी अर्ज दाखल झाले असुन काही स्वतंत्र उम्मेदवारांची उपस्थिती ही सदर निवडनुकीत रंगत आणनार हे विशेष*
*तर वाकोडी जिल्हापरिषद क्षेत्रातून राष्ट्र समर्पण पार्टीच्या उम्मीदवार वैशाली ताई विजय हिवराले यांनी उम्मेदवारी अर्ज दाखल केल्याने स्थापीत जिल्हापरिषद सदस्या सह भाजपचा ही मार्ग कठीण होऊण सदर लढत तीरंगी व चुरशीची होण्याची शक्यता आहे*
*नामंकन अर्ज दाखल करतेवेळी काँग्रेसचे मनोहर कुंभारे,मधु निमजे,सतिश लेकुरवाळे,साहेबराव विरखरे,मनोज बसवार,श्रीजय देशमुख,राजेश खंगारे,पंचायत समीती सभापती,उपसभापती,सदस्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थीत होते तर भाजपच्या वतीने देविदास मदनकर,तुषार उमाटे,नरेन्द्र ठाकुर,प्रमोद ढोले,अशोक तांदुळकर,नितीन राठी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.*
*निवडणूक अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सर्व उम्मेदवारांचे अर्ज स्विकारले असुन अर्जाची छाननी व उम्मेदवारांची अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रिये नंतरच सदर पोट निवडनुकीत जोश येण्याची शक्यता आहे*