Breaking News

*गुप्ता कोल वाशरीच्या धुळामुळे शेतीचे व ग्रामस्थाचे आरोग्यास नुकसान* *संबधित अधिका-यांच्या उपस्थित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गुप्ता कोल वासरी कंपनी ची कबुली*

*गुप्ता कोल वाशरीच्या धुळामुळे शेतीचे व ग्रामस्थाचे आरोग्यास नुकसान*

*संबधित अधिका-यांच्या उपस्थित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गुप्ता कोल वासरी कंपनी ची कबुली*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – गुप्ता कोल वाशरीच्या कोळश्या धुळीने शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी आणि ग्रामस्थाचे आरोग्य धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी वारंवार निवेदन देऊन दखल न घेतल्याने स्थानिय नागरिकांनी माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव ह्यांच्या नेतुत्वात मा. वंदना सवरंगपते उपविभागीय अधिकारी रामटेक यांचेशी शिष्टमंडळाने न्यायीक मागणी रेटुन धरल्याने संबधित अधिकाऱ्यांच्या उपस्थित गुप्ता कोल वासरी कंपनी व्दारे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना येणाऱ्या आठ दहा दिवसात नुकसान भरपाई देण्याची कबुल करण्यात आली.


गट ग्रामपंचायत घाटरोहणा (एंसबा) व गट ग्रामपंचायत वराडा (वाघोली) शिवार लगत येसंबा जवळ गुप्ता कोल वाशरी महामिनरल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी याच वर्षी सुरू होऊन रोज चार, पाचशे ट्रक कोळसा येणे-जाणे आहे. खदानचा कोळशा आणुन उघडयावर टाकुन पोकलँड व जेसीबी मशीनने कोळशा बारीक करून प्रकिया करित ट्रक मध्ये भरून बाहेर पाठविला जातो. कोल वासरीची कोळशा धुळ उडुन वराडा, वाघोली, एंसबा, नांदगाव व गोंडेगाव परिसरातील १०० हेक्टर वर शेतातील मोसंबी, कापुस, तुर, गहु, चना, मिरची, वांगे, गोबी सर्वच पिकाचे भंयकर नुकसान झाले आहे. कापुस काढण्यास शेतमजुर आले नाही. मोसंबी, मिरचे बाजारात विकायला नेल्यास कोणी घ्यायला तयार नव्हते. शेतपिकाचे अतोनात नुकासान शेतकऱ्याला भोगावे लागले आहे. दिवसभर शेतात काम करताना उडणाऱ्या धुळीने शरीर, कपडे काळे झाल्याने गावात जायची सुध्दा लाज वाटत होती. कंपनीतुन कोळसाच्या उडणाऱ्या धुळीमुळे जमिन, विहीर, नाल्याचे पाणी प्रदुषित होऊन गावात रोगराई पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. नाले, विहीरीचे प्रदुषित पाणी नागरिक, जनावरे पित असल्याने शेतकरी, गावकऱ्यांचे व जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यास्तव शेतकऱ्यांच्या व गावकऱ्याच्या जिवाशी खेळ होऊ नये म्हणुन गुप्ता कोल वासरी कंपनीच्या कोळशा धुळीमुळे झालेले शेतपिका चे नुकसान शेतकऱ्यांना त्वरित कंपनी मालकाने दयावे. तसेच गावापासुन दुर दुसरी कडे जिथे कुणाचे नुकसान होणार नाही अश्या ठिकाणी स्थानातरित करण्यात यावी. अशी न्यायीक मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव यांच्या नेतुत्वात मा. वंदना सवरंगपते उपविभागीय अधिकारी रामटेक यांचे कार्यालयात रेटुन धरल्याने मा. प्रशांत सांगाडे तहसिलदार पारशिवनी मा. महाराष्ट्र प्रदुर्शन नियंत्रण मंडळ अधिकारी, मा. वाघ, मंडळ कृषी अधि कारी हया संबधित अधिकारी व गुप्ता कोल वॉसरीज चे मा. गुप्ता हयांचेशी सखोल चर्चा करून कोल वॉसरी च्या धुळामुळे नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन व्यवस्था करून झालेले शेतकऱ्यांचे नुकसान कृषी विभागाच्या अहवाला नुसार योग्य ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना येणाऱ्या आठ ते दहा दिवसात देण्याची कबुली करण्यात आली. या प्रसंगी रामटेक क्षेत्राचे माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव, दिलीप राईकवार, कमल सिंह यादव, घाटरोहणा (एंसबा) माजी सरपंच दिंगाबंर ठाकरे, उपसरपंच अशोक पाटील, किशोर बेहुणे, प्रकल्पग्रस्त शेतकरी तेजराम खिळेकर, दिलीप ठाकरे, कृष्णाजी खिळेकर, मारोतराव लसुंते, दिलीप चिखले, हिरालाल खिळेकर, घनश्याम वाढई, संदीप पांडे, रामा लांडगे, सुरज काळे, युवराज नाकतोडे, प्रमोद लांडगे, सुधाकर खिळेकर, धनराज पांडे, संदीप ठाकरे, अतुल चरडे, राजेश खिळेकर, सोनु ठाकरे, प्रमोद गि-हे, अकील अहमद खिजराई, प्रमोद ठाकरे, शालुबाई खिळेकर, शोभा पांडे, चंद्रभागा खिळेकर, अनुसया चौधरी आदि नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*डॉ विनिशा ने किया परिवार का नाम रोशन* *स्नातक की उपाधि प्राप्त कर सावनेर वासियोका मान बढ़ाया*

🔊 Listen to this *डॉ विनिशा ने किया परिवार का नाम रोशन* *स्नातक की उपाधि …

06:17