*येसंबा येथे बालगोपाळा सह रंगपंचमी साजरी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – येसंबा (सालवा) ग्राम पंचायत व्दारे आंगणवाडी च्या बालगोपालासह रंगपंचमी चा आंनदोत्सव साजरा करण्यात आला.
मंगळवार दिनांक .२२ ला होळी रंगपंचमी निमित्त ग्राम पंचायत येसंबा व्दारे आंगणवाडी मध्ये बालस्नेही रंगपंचमी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
ग्रामपंचायत येसंबा सरपंच श्री. धनराज हारोडे यांचे कडुन अंगणवाडी येथील बालोपालांना गाठी वाटप करून बालकांचा आनंद व्दिगुणीत करण्यात आला. या प्रसंगी बालस्नेही उपसरपंच श्री. रविन्द्र बांगडे, प्राथमिक शाळा येसंबा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.फुलचंदजी ईरपाते, समाजसेविका हिराताई चकोले, अंगणवाडी सेविका मायाताई चकोले, अंगणवाडी मदतनिस कांताताई गजभिये, अरूणाताई बांगडे, आशा वर्कर सुषमाताई गजभिये सह अंगणवाडीतील बालगोपाल आदी ने आनंदोत्सव म्हणुन रंगपंचमी साजरी केली.